बीड (रिपोर्टर): बीड शहर वाहतूक पोलिसांकडून नियमांचे पालन न करणार्या वाहनधारकांना दंड आकारला जात आहे. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर अनेक वाहनधारकांना पोलिसांनी दंड दिला आहे.

नंबर प्लेट नसणे, ट्रिपल सिट, गाडीचे लायसेन्स नसणे यासह इतर नियमांचे पालन न करणार्या वाहनधारकांना वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलिसांनी आज सकाळी अनेक वाहनधारकांना दंड आकारला आहे. दररोज अनेक वाहनधारक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.






