पित्यानेच केला मुलीवर अत्याचार.
नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
नेकनूर, (रिपोर्टर)ः- नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलंकित घटना घडली. पित्याने आपल्या 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने नेकनूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यास बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील दाम्पत्यामध्ये घरगुती वादनिर्माण झाला होता. या वादातून पत्नी पुण्याला निघून गेली होती. मुलगी घरी होती. 11 एप्रिल रोजी नराधम पित्याने रात्री आपल्याच मुलीवर अत्याचार केला. सदरील हा प्रकार मुलीची आई पुण्यावरून आल्यानंतर समोर आला. पिडीतेच्या आईने याबाबत नेकनूर पोलीस ठाण्यात जावून नराधम पित्या विरोधात तक्रार दाखल केली त्यानुसार त्याच्या विरोधात बाल लैगिंक अत्याचारा विरोधात गून्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पित्याने माणूसकीला काळीमा फासली आहे.