किल्ले धारूर( रिपोर्टर)ः- धारूर तहसील कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जवळगाव येथे शासनाने केलेल्या अन्यायाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. दारू तहसील कार्यालयावर काल जवळगाव येथे शासनाने केलेल्या अन्यायाचे विरोधात मार्क्सवादी कम्युनिट पक्षाचे वतीने निदर्शने करण्यात आली त्याचबरोबर धारूर तालुक्यातील गायरान धारकांची नावे सातबारा देण्यात यावेत यासाठी आंदोलन करण्यात आले.

शासनाने अनेक गायनधारकांवर अन्यायकारक भूमिका घेत अन्याय केलेला आहे अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथेही असाच प्रकार घडला होता शासनाने येथील गायरान धारकांवर अन्याय केला होता याचा निषेध करत मार्क्सवादी कमी पक्षाने निदर्शने केली आहे त्याचबरोबर धारूर तालुक्यातील अनेक गायरान धारकांची नावे सातबारा करण्यात यावा गायनधारकांवर अन्याय करण्यात येऊ नये यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यांची निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर कॉम्रेड डॉ अशोक थोरात कॉम्रेड सय्यद रज्जाक ,कॉम्रेड दत्ता डाके कॉम्रेड काशीराम , कॉम्रेड संजय चोले,कॉम्रेड मनीषा ताई सह आदींची उपस्थिती होती.