बीड, (रिपोर्टर) ः निराधारांची नेहमीच हेळसांड होते. प्रशासकीय कर्मचार्यांच्या गैरकारभारामुळे निराधारांना त्रास सहन करावा लागतो. आधार लिंक केल्याशिवाय आता निराधारांचा पगार होणार नसल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक तालुकापातळीवर निराधारांची डिबीटी केली जात आहे. बीड तहसील कार्यालयात दुपारी 12 वाजेपर्यंत कर्मचारी हजर राहत नसल्याने वृद्धांना ताटकळत थांबावे लागत आहे.

बीड तालुक्यात शेकडो निराधारांची संख्या आहे. या निराधारांना मानधन दिले जात असते. येथून पुढे निराधारांची डिबीटी म्हणजेच आधार लिंक करणे गरजेचे आहे. आधार लिंक करण्यासाठी जिल्ह्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात निराधारांची गर्दी असते. बीड तहसील कार्यालयातही दररोज अनेक निराधार सकाळपासून कार्यालयात येऊन बसत असतात. दुपारी 12 वाजेपर्यंत सदरील कार्यालयाचे कर्मचारी येत नाही. त्यामुळे निराधारांना ताटकळत थांबावे लागत आहे. निराधारांची कामे वेळेवर करणे ही प्रशासकीय कर्मचार्यांची जबाबदारी आहे.
तहसीलदारांनी याकडे लक्ष द्यावे
सध्या उन्हाची तिव्रता भयानक आहे. अशा उन्हामध्ये वयोवृध्द डिबीटी करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये येत असतात. त्यात पुन्हा कर्मचार्यांचा अरेरावीपणा व वेळेवर हजर न राहणे, त्यामुळे वयोवृद्धांना त्रासांना सामोरे जावे लागत आहे. याकडे तहसीलदार यांनी लक्ष घालून कर्मचार्यांना धारेवर धरणे गरजेचे आहे व निराधारांचा वेळेत कामे करून द्यायला हवीत.