
बीड, (रिपोर्टर) ः जिल्हा परिषद विभागातील हिवताप कार्यालयातील कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी लक्षवेध आक्रोश निदर्शने केली. हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
हिवताप विभागातील कर्मचार्यांच्या मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. कर्मचार्यांनी आपल्या मागण्यांसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, याकडे दुर्लक्ष केले आहे. आपल्या न्यायहक्कासाठी हिवताप विभागातील कर्मचार्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.