नाशिक, (रिपोर्टर)ः- शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा नाशिक येथे पार पडत आहे. या निर्धार मेळाव्यात पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकार्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले त्यात त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यामध्ये करण्यात येत असलेल्या कपातीवर भाष्य केले तसेच ही योजना लवकरच बासनात कशी गुंडाळली जाणार याचा सत्ताधार्याचा प्लॅनही सांगितला.

100 दिवस झाले या सरकारने एकतरी चांगली योजना आणली का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. त्यानंतर पुढे म्हणाले की, लाडकी बहीण योजना 500 रुपयांवर आली. आपण तर 3000 रुपये देणार होतो. पण भाजप असेल, एसंशि असेल, दादांचा गट असेल या सर्वांनी गावागावात जाऊन सांगितले होते की तुम्हाला आम्ही 2100 रुपये देऊ. अजून महिला वाढतील.एक वेगळी कातडी लागते. एक वेगळा निर्लज्जपणा लागतो कारण तुमचं एवढ बहुमताचे सरकार आल्यानंतरही तुमच्या जाहीरनाम्यातील एकसुद्धा गोष्ट बजेटमध्ये आणत नाहीत.