येळंबघाट येथील प्रकार
नेकनूर, (रिपोर्टर)ः-रस्त्याने पायी जाणार्या एका 16 वर्षीय मुलाला मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून तीन ते चार किमी अंतरावर नेहून त्याच्याकडील पाच हजार रूपये काढून घेतल्याचा प्रकार आज सकाळी घडला आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस तपास करत आहेत.
सय्यद सोहेल मोहसीन (वय 16, रा.येळंबघाट) हा येळंबघाट येथील माऊली चौकातून पायी जात असतांना त्याला एका अज्ञात व्यक्तीने मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून तीन ते चार किमी अंतरावर आणत त्याच्या खिशातील पाच हजार रूपये काढून घेतले सदरील हा प्रकार मुलाने आपल्या घरातील व्यक्तींना सांगितल्यानंतर याबाबत नेकनूर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अनिल राऊत, उबाळे, बांगर, आशा चौरे करत आहेत.