बीड दि. 20 (प्रतिनिधी):- शुभारंभाच्या मुहुर्तावर ग्राहकांसाठी बंपर ऑफर सिया पेट्रोलियम या पंपाने जाहीर केली आहे. या पंपावर पेट्रोल, डिझेल भरणार्या ग्राहकांना दोन रुपयांनी स्वस्त पेट्रोल, डिझेल दिले जाणार आहे. जिओच्या नव्या जिओ बीपी पेट्रोल पंपाच्या शुभारंभाचे औचित्य साधून पेट्रोल पंप मालकाने बंपर ऑफर जाहीर केली आहे.
सिया पेट्रोलियम पाडळशिंगी टोलनाक्याजवळ हिरापूर बीडया पंपावर डिझेल आणि पेट्रोल चार चाकी, दुचाकी वाहनांमध्ये भरणार्या ग्राहकांना पेट्रोल, डिझेलमध्ये 2 रुपयांची सूट देण्यात आली आहे. म्हणजे या पंपापवर डिझेल आणि पेट्रोल इतर पंपावरील भावापेक्षा 2 रुपयांनी स्वस्त दिले जाणार आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी आम्ही हे पाऊल उचललेले असल्याचे पेट्रोल पंप चालकाने सांगितले.