ह.भ.प. महंत शिवाजी महाराज नारायणगड मठाधिपती
स्व आईचा रामनामाचा वसा आपल्याला असाच अखंड पुढे न्यायचा आहे -हेमंत क्षीरसागर

नवगण राजुरी (रिपोर्टर): स्वर्गीय सुरेखाताई क्षीरसागर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेल्या पंचदिनात्मक कीर्तन महोत्सवाची नारायणगडचे महंत ह.भप. शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता गेले चार दिवस नवगण राजुरी येथे नेत्रदीपक असा भव्य मंडपात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तने झाली या सोहळ्यामध्ये राजुरीच नव्हे तर पंचक्रोशोतील असंख्य भाविकांना मंत्रमुग्ध करणारी हि कीर्तने ऐकून श्रोत्यांचे मने तृप्त झाली. आज सकाळी भव्य अशी नगरप्रदक्षिणा काढण्यात आली यात लहान मुलांनी विविध साधू संत, देवता, समाजसुधारक यांची वेशभूषा करून सहभागी झाली होती तर गावातील महिलामंडळ कलश, टाळ, घेऊन भजने गात सहभागी झाल्या तर तरुण मंडळ लेझीम पथकासह भाविक टाळमृदूंगाच्या पथकाने गावातील वातावरण भक्तिमय झाले होते
विश्वाचा जनिता ।
म्हणे यशोदेसि माता ॥1॥
ऐसा भक्तांचा अंकित ।
लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु.॥
निष्काम निराळा ।
गोपी लावियेल्या चाळा ॥2॥
तुका म्हणे आलें ।
रूपा अव्यक्त चांगलें ॥3॥
या
संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे त्यांनी यावेळी निरूपण केले
पुढे बोलताना ते म्हणले कि काकू नाना स्वर्गीय सुरेखाताई यांच्या संस्कारांची हि ठेव आहे पुढील पिढी सुद्धा अध्यात्माशी असलेली आपली नाळ कायम ठेवली आहे स्वर्गीय सुरेखाताईंनी राम नामाचा जप करत आपला देह सोडला त्यामुळे त्यांचा आत्मा आता परब्रम्ह स्वरूप झाला आहे .त्यांनी केलेले पुण्य आज फळाला आले आहे
हेमंत क्षीरसागर आपल्या प्रास्तविकात मनोगत क्षीरसागर परिवार व अध्यात्म यांचा वारसा खूप मोठा आहे . जगात सर्वसामावेशकपणा आपल्याला प्रभू रामाच्या चरित्रातून मिळतो असे आई नेहमी म्हणायच्या . त्यांचा राम नाम जपाचा वारसा असाच पुढे चालवत न्यायचा आहे . हा फक्त क्षीरसागर परिवाराचा कार्यक्रम नाहीतर संपूर्ण राजुरी सर्कलचा कार्यक्रम आहे तुम्ही दिलेल्या उंदन्ड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद
यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर ,रवींद्र क्षीरसागर, डॉ विठ्ठल क्षीरसागर, योगेश क्षीरसागर,आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज , विजयराजजी बंब ,अजित वरपे ,ह.भ.प. शिवाजी महाराज येवले ,नारायण महाराज डिसले ,विलास बडगे ,दिनकर कदम, संजय कुलकर्णी बळीराम गवते ,गौतम खटोड ,आदींसह हजारो भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.





