बीड, (रिपोर्टर) ः दोन दिवसापुर्वी राज्य सरकारने बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली केली. त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आज सकाळी 10.15 वा. आपल्या पदाचा पदभार स्विकारत मुख्य सचिव श्रीमती सुजाता सैनिक यांची व्हिडीओ कॉन्फरन्स उपस्थितीत राहत आपल्या कामकाजाला सुरुवात केली.

विवेक जॉन्सन यांनी प्रशिक्षण कालावधीमध्ये माजलगाव नगर पालिकेत 1 महिना मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर गुन्हा दाखल करत आपल्या कामाची चुनूक बीडवासियांना दाखवलेला आहे. जॉन्सन हे 2018 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील तुकडीचे अधिकारी आहेत. आयएएस पदावर निवड होण्यापुर्वी 2016 साली ते आयआरएस या पदावरही त्यांची निवड झाली होती. जॉन्सन यांच्यापुढे जिल्हा दंडाधिकारी म्हणून बिघडलेला कायदा व सुव्यवस्था आबाधित राखणे, तिव्र उन्हाळ्याच्या काळात पिण्याचे पाणी नागरिकांना पोहचते करणे आदी आव्हाने आहेत.