मुख्यमंत्री महोदय, आता सांगा 302 चा गुन्हा कोणावर दाखल करावा -अजित पवार
बीड (रिपोर्टर) एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. भाजपाने एकनाथ शिंदेंच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपुर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने राज्य उघड्यावर पडले. जुलै महिन्यात महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी होऊन शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी प्रचंड अडचणीत आला. राज्यभरात गेल्या महिन्यात 89 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. मात्र सत्ताकारणाच्या विळख्यात अडकलेल्या शिंदे-फडणवीसांना शेतकर्यांची व्यथा समजली नाही. परंतु विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी राज्यभर दौरे सुरू केले. सध्या हे दोघे मराठवाड्याच्या दौर्यावर असून दोघांच्या शासनावर पवार-मुंडेंचे सरकार सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचे पुन्हा एकदा यातून सिद्ध होत असून नांदेड जिल्ह्यात पवार-मुंडे शेतकर्यांच्या शेतात जावून पिकांची पाहणी करत आहेत. शेतकरी रस्त्या रस्त्यावर आणि बांधा-बांधावर दोघांची भेट घेत आपल्या व्यथा मांडत आहेत.
शेतकर्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण? अजित पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्या कमी करण्यासाठी योग्य ती धोरणे राबवली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधी झाला की केली होती. मात्र, केवळ घोषणा करुन उपयोग नाही तर प्रत्यक्षात योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. आश्वासनांनी शेतकर्यांच्या समस्या मिटणार नाहीत तर त्यासाठी शेतकर्यांच्या बांधावर येणे गरजेचे आहे.
शिंदे सरकारची स्थापना होताच शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, गेल्या महिन्याभरात 89 हून अधिक शेतकर्यांच्या आत्महत्या राज्यात झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार हे नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. दरम्यान, माहूर येथे शेतकर्याने आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी या घटनेला जबाबदार कोण? मुख्यमंत्री महोदय आता सांगा 302 चा गुन्हा नेमका कुणावर दाखल करावा असा सवाल त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. सध्या जगाचा पोशिंदा अडचणीत आहे. त्याला अडचणीतून बाहेर काढल्याशिवाय आत्महत्या कशा रोखणार असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.
आश्वासनांचा उपयोग नाही, कृती आवश्यक
शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्या कमी करण्यासाठी योग्य ती धोरणे राबवली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधी झाला की केली होती. मात्र, केवळ घोषणा करुन उपयोग नाही तर प्रत्यक्षात योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. आश्वासनांनी शेतकर्यांच्या समस्या मिटणार नाहीत तर त्यासाठी शेतकर्यांच्या बांधावर येणे गरजेचे आहे. सगळेच प्रश्न हे मुंबई राहून मार्गी लागणार नसल्याचा सल्लाही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. अतिवृष्टी होऊन आठवड्यापेक्षा अधिकचा काळ गेला आहे. असे असताना अद्यापही पंचनामे हे झालेले नाहीत. सर्व शेतकर्यांचे एकच गर्हाणे असून आता मदतीसाठी सरकारने पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.दौरे महत्वाचे आहे का शेतकर्यांचे दुःख
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राज्याच्या दौर्यावर आहेत. या दरम्यान, ते नाशिक औरंगाबाद याठिकाणा पदाधिकारी यांच्या भेटी घेणार आहेत. एकीकडे शेतकरी अडचणीत असताना त्याला वार्यावर सोडून हार-तुरे घेण्यात हे सरकार व्यस्त आहे. त्यामुळे शिंदे सरकारला दौरे महत्वाचे आहेत का? शेतकर्यांचे दुख: असा सवालही यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. एकंदरीत नुकसानीची पाहणी करीत असताना राज्य सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी पवार यांनी सोडेलेली नाही.