अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये उपचार सुरू

अंबाजोगाई (रिपोर्टर): विवाह सोहळा आटोपून गावी परतणार्या वर्हाडाच्या टेम्पो किनगाव मार्गे परभणीकडे जात असताना परळीच्या धर्मापुरी लगत असलेल्या किनगाव जवळ तो पलटी झाला. या अपघातात 38 वर्हाडी जखमी झाले. जखमींना तात्काळ अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील जखमी रुग्णालयात आल्यानंतर नातेवाईकांसह मदत करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
परभणी जिल्ह्यातील मुस्लीम बांधव अहमदपूर येथे विवाह सोहळ्यासाठी आले होते. विवाह सोहळा आटोपून हे सर्व एका टेम्पोने किनगाव मार्गे परभणीकडे जात होते. परळी तालुक्यातील धर्मापुरीपासून काही अंतरावर असलेल्या किनगाव जवळ हा टेम्पो पलटी झाला. यात 38 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. रस्त्यावरून येणार्या-जाणार्यांनी या जखमींना तात्काळ अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर जखमी आल्याची माहिती होताच वैद्यकीय अधिक्षक डॉ. राकेश जाधव, आरएमओ डॉ. नागेश आबदगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नितीन साखरे, निलेश पुरी यांनी तात्काळ सर्व जखमींवर उपचार केले. यातील काहींना प्राथमिक उपचार करून तात्काळ सुट्टी देण्यात आली मात्र दहा ते पंधरा गंभीर जखमींवर उपचार
सुरू आहेत.
अपघातात जखमींची नावे
जायदा शेख, तस्लीम शेख, शरीफ शेख, इरफान शेख, अमिना शेख, अरबाज शेख, इबराहीम मोहम्मद शेख, लियाखत शेख, सलमान अज्जू पठाण, आफरीन मोहम्मद सय्यद, सानिया इस्माईल शेख, मोहम्मद सय्यद, आसेफ अमीर शेख, अरबाज शेख, समीर शेख, जाकेर पठाण, रेहान शेख, फरहान शेख, ताहेराबी शेख, अरशद शेख, इमरान शेख, इस्माईल शेख, साबेर शेख, सोफियान पठाण, उमेर शेख, मुश्ताक शेख, साबेर शेख, जानिदा शेख