शिंदे गटाचा हायक्लास परफॉर्मन्स

मुंबई (रिपोर्टर): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नव्या सरकारची सूत्रं हाती घेतल्यानंतर पहिल्या 100 दिवसांसाठीचा रोडमॅप जाहीर करण्यात आला होता. हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाताली सर्व खात्यांच्या 100 दिवसांतील कामगिरीचा आढावा घ्यायला सुरुवात केली होती. कामगिरीच्या मूल्यमापनाची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेला शंभर दिवसांच्या आढाव्यात मंत्रालयातील आठ विभागांची कामगिरी अव्वल केंद्र सरकारच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीया या कंपनीकडून प्रत्येक विभागाचं लेखापरीक्षण अर्थात ऑडिट करण्यात आले आहे. या ऑडिटनंतर एकूण 60 विभागांपैकी सर्वात चांगली कामगिरी करणार्या आठ विभागांची निवड करण्यात आली आहे. आता या आठ विभागांमधून पहिले तीन विभाग निवडले जाणार आहेत. येत्या आठवडाभरात महायुती सरकारमधील सर्वात चांगली कामगिरी करणारे तीन विभाग कोणते असतील, याचा निकाल जाहीर केला जाईल. तर इतर विभागांना कलर कोड देऊन कामगिरी सुधारण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.
या विभागांची ग्रीन झोन, यलो झोन आणि रेड झोन अशी विभागणी केली जाईल. चांगली कामगिरी असणारे विभाग ग्रीन झोनमध्ये, मध्यम कामगिरी असणारे विभाग यलो झोनमध्ये आणि खराब कामगिरी असणारे विभाग रेड झोनमध्ये अशाप्रकारे ही वर्गवारी असेल.








