सबस्टेशनमध्ये जनावरे आणायची का?
लिंबागणेश (रिपोर्टर): बीड तालुक्यातील लिंबागणेश उपकेंद्र येथील बोरखेड फिटरचे केबल जळाल्याने 2 दिवसांपासून महाजनवाडी येथील ग्रामस्थ अंधारात असुन जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.वीज नसल्याने मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी देता येत नसल्याने शेतकरी संतप्त झाले असुन सबस्टेशनमध्ये जनावरे आणायची का? असा संतप्त सवाल शेतकरी भिमराव सुरवसे यांनी केला आहे. महावितरणच्या अधिकार्यांनी तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे.
बोरखेड फिटरचे केबल लिंबागणेश येथील उपकेंद्रात जळाल्याने 2 दिवसांपासून गावाला वीज पुरवठा खंडित आहे. माणसं उकाड्याने हैराण झाली आहेत. मुक्या जनावरांचा पाण्याचा प्रश्न आहे.2 दिवसांपासून लिंबागणेश उपकेंद्राचा चार्ज असणारे उप अभियंता अभिजित शिंदे यांना 2 दिवसांपासून फोन लावतोय पण फोन उचलत नाहीत. लवकरात लवकर जळालेल्या केबलच्या ठिकाणी नविन केबल टाकुन वीजपुरवठा सुरळीत नाही केला तर आम्ही ग्रामस्थ रस्त्यावर उतरू असा महावितरणला इशारा देत असल्याचे महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी म्हणाले.