
बीड (रिपोर्टर): एप्रिल महिना संपायला आता काही दिवस उरले आहेत. मे महिन्याची सुरुवात होण्याआधी तुम्ही बँकेतील काही कामे संपवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. अनेकदा आपण बँकेत पोहचतो आणि कळतं की आज बँक बंद आहे. अशी गैरसोय टाळण्यासाठी तुमच्या परिसरातील बँकांना कधी सुट्टी आहेत, हे माहिती असणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, उद्यापासून 30 तारखेपर्यंत पुढील 4 दिवस विविध कारणांमुळे बँका बंद राहतील. या बँक सुट्ट्या सर्व बँकांमध्ये लागू होणार नाहीत. त्यामुळे तुमच्या बँकेचं यात नाव आहे का? हे तपासून घ्या.
रिझर्व्ह बँकेने जाहीर केली सुट्ट्यांची यादी
उद्या म्हणजेच 26 एप्रिल रोजी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (ठइख) च्या नियमांनुसार, दर महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहतील. त्यामुळे या दिवशी सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील. यानंतर, 27 एप्रिल रोजी रविवारची सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. ही बँकेची नियमित साप्ताहिक सुट्टी आहे. या दिवशीही देशभरातील सर्व बँका बंद राहतील.





