जुगार्यांनी तलाठी कार्यालयात खेळतात पत्ते

बीड, (रिपोर्टर)ः- प्रत्येक गावामध्ये तलाठी सज्जा बांधण्यात आला.त्यावर महसुल विभागाने लाखो रूपयांचा खर्च देखिल केलेला आहे. मात्र हे तलाठी कार्यालय वापरात आणले जात नाही. बहुतांश तलाठी कार्यालय शहराच्या ठिकाणी आहेत. मग ग्रामीण भागातील तलाठी कार्यालय बांधले कशासाठी ? बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील तलाठी सज्जा कार्यालय वार्यावर असुन याठिकाणी मद्यपी तेथे जावून दारू पितात, जुगारी पत्ते खेळतात . गावच्या तलाठ्यांना हा प्रकार दिसत नाही का? ते गावचा सज्जा सोडून शहराच्या ठिकाणी का ठाण मांडून बसतात ? बाबात वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.
गेल्याकाही वर्षापुर्वी प्रत्येक गाव पातळीवर तलाठी सज्जा कार्यालय बांधण्यात आले. त्यावर लाखो रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. या कार्यालयाचा वापर बहुतांश तलाठी करत नाहीत. तलाठी आपल्या सोयीनुसार शहराच्या ठिकाणी एखादी रूम भाड्याने घेतात आणि त्याठिकाणावरून कार्यालय चालवतात. मग शासनाने एवढा मोठा खर्च करून कार्यालय बांधलं कशासाठी ? बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील तलाठी कार्यालय देखिल वार्यावर आहे. सदरील कार्यालयात मद्यपी जावून दारू पितात, जुगारी पत्ते खेळतात मग हे कार्यालय मद्यपी आणि जुगार्यांसाठी बांधले की काय ? अशा संतप्त प्रतिक्रिया गावकर्यांतून व्यक्त केल्या जात आहेत.