30 तारखेपर्यंत सर्व्हे पूर्ण होईल का?
तारीख वाढवून देण्याची होवू लागली मागणी

बीड, (रिपेार्टर)ः- नवीन घरकुलासाठी ऑनलाईन सर्व्हे करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्व्हे करत असतांना ऑनलाईन अडचणी येवू लागल्या. या अडचणीमुळे सर्वाचे सर्व्हे तारखेच्या आत पूर्ण होतील का असा प्रश्न पडू लागला आहे. पूर्ण न झाल्यास तारीख वाढवून देण्याची मागणी अनेक गावकर्यांकडून केली जावू लागली आहे.
नवीन घरकुलांसाठी ऑनलाईन सर्व्हे होवू लागला. सर्व्हे करत असतांना संबंधिताचे डोळ्याचे स्कॅनिंग, आधार कार्डची केवायएसी केली जात आहे. मात्र कधी कधी ऑनलाईन अडचणी येत असल्याने डोळ्याचे स्कॅनिंग लवकर होत नाही. त्यामुळे त्याला वेळ लागू लागला. 30 एप्रिल पर्यंत प्रत्येक गावातील वंचितांचा सर्व्हे होईल का ? असा प्रश्न पडू लागला आहे. वेळेत सर्व्हे जर झाला नाही तर काही लोक सर्व्हेपासून वंचित राहु शकतात. त्यासाठी तारीख वाढवून देण्याची मागणी अनेक गावातील नागरीकांकडून केली जावू लागली आहे.





