तांड्यांना जोडणार्या रस्त्यांचे डांबरीकरण करा
माजलगाव/तालखेड (रिपोर्टर) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान सभा, ऊसतोडणी कामगार व वाहतूक कामगार संघटना, शेतमजूर युनियन, एसएफआय आणि डीवायएफआय तर्फे माजलगाव तालुक्यातील तालखेड फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर ’चक्का जाम आंदोलन’ करण्यात आले. तालखेड परिसरातील तांड्यांना जोडणार्या रस्त्यांचे डांबरीकरण करा आणि शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन झाले. या रास्ता रोकोमुळे महामार्गावर घंटाभर वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
आज ३१ जुलै रोजी संयुक्त किसान मोर्चाने देशभरात आंदोलने करण्याची हाक देण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून तालखेड फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करून पुढील मागण्या करण्यात आल्या. (१) तालखेड – जामगा तांडा – येळा तांडा या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करा. (२) तालखेड – झिंजुर्डी तांडा या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करा. (३) तालखेड – चाहूर तांडा या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करा. (४) राष्ट्रीय महामार्ग ते कुरण तांडा या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करा. (५) तांड्यावरील खंडित वीजपुरवठा सुरू करा. (६) एमएसपीची केवळ घोषणा नको, उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभावाचा कायदा करा. (७) केवळ सत्ता मिळवण्यासाठी स्वामिनाथन आयोगाचा पुळका कशाला ? आता त्याची शेतकरी हितासाठी अंमलबजावणी करा. (८) शेतकर्यांना आत्महत्येच्या खाईत लोटणारे आयात-निर्यात धोरण बदलून ते खर्या अर्थाने शेतकरी हिताचे करा. (९) संयुक्त किसान मोर्चाच्या किसान आंदोलनात सरकारने शेतकर्यांवर दडपशाहीने दाखल केलेले सर्व गुन्हे परत घ्या. (१०) रासायनिक खतांच्या किमती कमी करून खतांचा काळा बाजार थांबवा. (११) शेती उपयोगी सर्व साहित्य जीएसटी मधून वगळून ते मोठ्या अनुदानावर व मुबलक प्रमाणात शेतकर्यांना उलपब्ध करून द्या. (१२) सर्व प्रलंबित पीक विम्याचे शेतकर्यांना त्वरित वाटप करा. (१२) या खरीप हंगामात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची केंद्र व राज्य सरकारने दखल घेऊन त्वरित मदत करा. (१३) शेतकर्यांना यंदाचे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करा. (१४) ऊसतोडणी कामगारांच्या कल्याणकारी महामंडळाचे कामकाज त्वरित सुरु करा. त्याअंतर्गत असलेल्या योजनांची सुरुवात करा. ऊसतोडणी कामगारांच्या पाल्यांसाठीची वसतिगृहे तात्काळ सुरु करा. (१५) तालुक्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बससेवा द्या. विद्यार्थी हात करेल, तिथे बस थांबवण्याची सूचना करा. (१६) विद्यार्थी विरोधी नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा. (१७) सर्व सरकारी विभागातील रिक्त पदे त्वरित भरा. सर्व पद भरतीची प्रक्रिया चझडउ मार्फत करा.
या आंदोलनात एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, शेतमजूर युनियनचे राज्य सचिव व माकपचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ. बळीराम भुंबे, ऊसतोडणी कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. अशोक राठोड, डीवायएफआयचे तालुका अध्यक्ष व माकपचे तालखेड शाखा सचिव कॉ. विनायक चव्हाण, माकपचे टाकरवण शाखा सचिव कॉ. अशोक भुंबे, संतोष जाधव, विजय राठोड, कॉ. शांतीलाल पट्टेकर, कॉ. सुभाष राठोड, कॉ.रोहिदास ताराचंद जाधव, कॉ. भीमराव जाधव, कॉ. मधू आडागळे, कॉ. प्रकाश गरड, कॉ. संजय चव्हाण, कॉ.लक्ष्मण राठोड, विनायक राठोड, राजू राठोड, मोहन राठोड, गोरख पवार, प्रकाश पवार, बबन राठोड, आदी उपस्थित होते.