
बीड, (रिपोर्टर)ः- पदवीधर शिक्षकांनी बदल्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केले आहे. या धरणे आंदोलनामध्ये अनेक पदवीधर शिक्षकांची उपस्थिती होती.
बीड जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक पदवीधर पदावर कार्यरत असलेल्या भाषा व सामाजिक शास्त्र विषयाच्या 74 प्राथमिक पदवीधर शिक्षकांनी शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन परिपत्रक 3
ऑक्टोंबर 2016 व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-4 व शालेय शिक्षण व क्रिडा विभाग दि. 24 मार्च 2023 मधील 2 टिप (1 क) नुसार सेवा अंतर्गत मान्यता प्राप्त मुक्त विद्यापीठातून बीएससी पदवी प्राप्त केली असल्याने विषय रूपांतर करून गणित विज्ञान विषय संवर्धात प्राथमिक शिक्षक पदवीधर म्हणून समावेश करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे मात्र याबाबत कोणतीही ठोस भुमिका घेतली नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी विकास गवते, दिलीप सानप, जितेंद्र सांगळे, चव्हाण निलेश, सानप ए.एन, वाहळ, कोकाटे, खाकरे, घोडके, आळणे सह आदींचा सहभाग होता.