दोघांचा मृत्यू; आम्ला वाहेगावात हळहळ
तरूणाकडे होते एसबीआय बँकेचे कर्ज

गेवराई, (रिपोर्टर)ः- गेवराई तालुक्यातील आमला वाहेगाव येथील एका 35 वर्षीय तरूणाने काल दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान गळफास घेवून आत्महत्या केली. मुलाने आत्महत्या केल्यानंतर काही तासाने तिच्या आईने विषारी औषध प्राषाण केल्याने तिला उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आईचा आज सकाळी 10.00 वाजता मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेने आमला वाहेगाव येथे शोककळा पसरली. तरूणाकडे हिरापुर शाखेच्या एसबीआय बँकेचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते. त्याच बरोबर इतर खाजगी लोकांचेही कर्ज होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूण शेतकर्याने आत्महत्या केली. कर्जापाई मुलासह आईचा बळी गेला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गेवराई पोलीस करत आहेत.
अभिमान खेत्रे (वय 35)हा तरूण अल्प भुधारक होता. त्याच्याकडे हिरापुर शाखेच्या एसबीआय बँकेचे कर्ज होते. तसेच खाजगी लोकांचे देखिल कर्ज होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने काल 4 वाजण्याच्या दरम्यान गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेनंतर अभिमानची आई कौशल्य भागुजी खेत्रे (वय 70) हिने विषारी औषध प्राषाण केले. तिला उपचारार्थ बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज सकाळी तिचा मृत्यू झाला. आई आणि मुलाने आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्जाने आईसह मुलाचा बळी घेतला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गेवराई पोलीस करत आहेत.