गावकर्यांनी 1 मे ला केले ग्रा.पं. कार्यालयासमोर आंदोलन
आंदोलनकर्त्यांची प्रशासनाने दखल घेत कामाच्या चौकशीचे दिले आदेश

टाकरवण, (रिपोर्टर) ः टाकरवण येथील जलजीवन योजनेअंतर्गत चुकीचे काम झाले. गावकर्यांचे पाण्यासाठी हाल होऊ लागले. गावकर्यांनी 1 मे रोजी ग्रा.पं. कार्यालयासमोर आंदोलन केले होते. याची दखल जि.प. ने घेऊन या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गेवराई तालुक्यातील टाकरवण येथे जलजीवनची 5 कोटी रुपयांची योजना आहे. इतके पैसे खर्च करूनही नागरिकांना पाणी मिळेना. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होऊ लागले. 1 मे रोजी गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्याची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेऊन कामाची चौकशी करून त्याचा अहवाल 10 दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.





