रेल्वेतून खाली पडल्याने तरूण मरण पावल्याचा प्राथमिक अंदाज

परळी, (रिपोर्टर)ः- परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापुर शिवाराच्या रेल्वे पटरीवर आज सकाळी तरूणाचा मृतदेह आढळुन आला. सदरील हा तरूण रेल्वेतून पडला असल्याचे सांगण्यात येत असले तरी तो रेल्वे पटरीच्या मध्यभागी कसा पडेल ? असा प्रश्न ही उपस्थित होत आहे. हा अपघात आहे की घातपात ? याचा शोध परळी पोलीस घेत आहेत.
आज सकाळी काही लोकांना मलकापुर शिवारात असलेल्या रेल्वे पटरीवर तरूणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. घटनास्थळी रक्त पडलेलं होतं. घटनेची माहिती परळी पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात आणला होता. मयताची दुपारी ओळख पटली असून तो उदगिर येथील असल्याचे सांगण्यात येते. प्रवास करतांना पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून तशी माहिती समोर आली आहे. मात्र मृतदेह रेल्वे पटरीच्या मध्यभागी आहे त्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. हा अपघाता आहेे की घातपात ? या प्रकरणाचा तपास परळी पोलीस करत आहेत.