
गेवराई, (रिपोर्टर)ः-काश्मिर येथील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज गेवराई शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. या बंदमध्ये सर्व व्यापार्यांनी सहभाग घेतला होता. हा बंद सकल हिंदू समाज गेवराईच्या वतीने पाळण्यात आला होता.
गेल्या काही दिवसापुर्वी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. आज गेवराई शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. सर्व व्यापार्यांनी आप आपले व्यवहार बंद ठेवून घटनेचा निषेध केला. सदरील बंद सकल हिंदू समाज गेवराईच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.