काळेगाव हवेली सरपंच पदाचा निर्णय

बीड, (रिपोर्टर)ः- काळेगाव हवेली येथील महिला सरपंचांना पदावरून हटविण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी दिलेला होता. या विरोधात सरपंचांनी विभागीय आयुक्तांकडे अपिल केले होते. यावर विभागीय आयुक्तांनी सरपंचाच्या बाजुने निर्णय देत जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
श्रीमती रंजना भालेराव कानडे या काळेगाव हवेली येथील सरपंच आहेत. त्यांच्या विरोधात चौरंगनाथ माणिकराव पवार याने तक्रार दाखल केली होती. अतिक्रमणासह इतर मुद्दे उपस्थित करत सरपंच पद रद्द करावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकार्यांनी कानडे यांचे सरपंच पद रद्द केले होते. याबाबत कानडे यांनी विभागीय आयुक्तांकडे अपिल केले होते. त्यावर विभागीय आयुक्तांनी कानडे यांच्या बाजुने निकाल देत जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. कानडे यांच्या वतीने अक्षय जगताप यांनी काम पाहिले आहे.