चलो मुंबई, चलो मुंबई, चलो मुंबई
मराठा आंदोलक जरांगेंचा निर्णय
बीड (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली आहे. 29 ऑगस्टला मुंबई धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचामनोज जरांगे-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितला आहे. आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सरकारकडं मराठा बांधवांनी समजून घ्या कारणच नाही येत आता आपल्याला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही, आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही. मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचा उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय. 28 ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
दोन वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत.मागील उपोषण सोडताना चार मागण्या तात्काळ अंमलबजावणी केले जाईल असे सांगितलं होतं. आज तीन महिने पूर्ण झाले, कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. मला समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघाव्या लागतात, संयम तरी किती दिवस धरायचा. 29 ऑगस्ट 2025 ला आम्ही मुंबईत जाणार आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. हे मुंबईत गेल्याशिवाय पर्याय निघत नाही हे आमच्या लक्षात आलं आहे. मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला त्या ताकतीने उठाव करावा लागणार आहे. सगळ्या मराठा बांधवांनी 29 ऑगस्टच्या अगोदर काम आवरून ठेवा. आता माघारी यायचं नाही, सगळे सोयर्याच्या अधिसूचनेला दीड वर्ष पूर्ण झाला आहे. पुढील आंदोलनाची दिशा एक ऑगस्ट रोजी सांगणार आहे.सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली, असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
जरांगे ज्या दिवशी उपोषणाला बसणार त्याच दिवशी ओबीसी मुंबईकडे कूच करणार -लक्ष्मण हाके
मराठा आंदोलक जरांगे यांनी उपोषणाचे अस्त्र उगारताच आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचे हत्यार उपसले. ते म्हणाले, ज्या दिवशी मनोज जरांगे उपोषणाला बसणार त्याच दिवशी महाराष्ट्रातला ओबीसी मुंबईकडे कूच करणार. ज्या दिवशी जरांगेंचा उपोषण सुरू होईल त्या दिवशी माळेगावच्या खंडोबाला नारळ फोडून आमचा मुंबईच्या दिशेने लाँग मार्च सुरू करू. जरांगे हा येडपट, पुळचट, बावळट माणूस असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली. सत्तेची झूल बाजुला सारून या माणसाने तुम्हाला निवडून दिले त्यांचा प्रश्न सभागृहात उचलला पाहिजे, असे म्हणत हाकेंनी ओबीसी आमदारांना झापलं.