बोअरवेलकडे नागरिकांचा पाणीटंचाईत उपयोगाचे साधन

पात्रुड,(रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात सध्या उष्णतेने कहर गाठला आहे. उन्हाची न तीव्रता आणि पाणीटंचाई यामुळे ग्रामीण भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. नदी, आणि जलसाठ्यांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने गावविहिरी आणि जुन्या आडांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. एकेकाळी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत होती, मात्र अलिकडील काळात घराघरांत नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे गावविहिरी दुर्लक्षित झाल्या आहेत. परंतु पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या विहिरींचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावविहिरींचे अस्तित्व लोकांच्या जीवनाशी निगडित होते. शिवकाळात गावातील नागरिकांचे पिण्याचे पाणी या विहिरींवरूनच उपलब्ध होत असे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर, वाढती लोकसंख्या आणि पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे गावातील डोंगरदर्यातील झर्यांवरून सायफन पद्धतीने नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना राबवली । गेली. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे काही झरे उघडली होती, त्यापैकी अनेक झरे वसाहतीतील अनधिकृत उत्खननामुळे उन्हाळ्यात शुष्क होऊ लागले आहेत. काही ठिकाणी पाणीवाटपाचे नवे यंत्रणा राबवली गेली असली तरी जुन्या गावविहिरींचे महत्त्व कमी झाले आहे.
नळ पाणीपुरवठा योजनांचा प्रभाव : अलिकडच्या काळात, पाणीपुरवठा योजना अमलात आणल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नळपाणी पुरवठा होऊ लागला आहे. जवळपास प्रत्येक गावात नळाद्वारे घराघरांत थेट पाणीपुरवठा होत असल्याने गावविहिरींचे महत्त्व कमी झाले आहे. सध्या अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही वर्षांपासून मिटला आहे. मात्र, पाणीटंचाईला प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील गावविहिरींचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत आवश्यक आहे.
विहिरींचे संवर्धन गरजेचे गावविहिरींचे पुनरुज्जीवन करणे म्हणजे त्यांचा केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार करणे नव्हे, तर एक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय आणि त्यावर काम करणे आवश्यक आहे. या विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार व स्थानिक प्रशासनाने समर्पक योजना राबवून यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. विहिरींमध्ये पाणी भरून त्यांना पुन्हा एक महत्त्वाचे जलस्रोत बनवणे गरजेचे आहे. विशेषतः उष्णतेच्या प्रमाणात वाढ आणि पाणीटंचाईच्या गंभीरतेमुळे, गावविहिरींच्या संवर्धनाच्या कामात अधिक तत्परतेने योगदान देणे आवश्यक आहे.
गावविहिरींचे संवर्धन करताना त्यांचा योग्य वापर केला गेला, तर ते पाणीटंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरू शकतात. गावविहिरी पुनरुज्जीवित केल्यास, त्यांचा उपयोग केवळ ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत म्हणूनच नव्हे, तर शहरी भागातील पाणी पुरवठ्यात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.