
महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाला 21 अधिकार्याचीं दांडी
राज्यमंत्री इंद्रनील नाईक संतापले, अधिकार्यांना नोटीस काढण्याचे आदे
जिल्हाधिकार्यांकडून बेशिस्त अधिकार्यांना नोटीसा
वादग्रस्त न.प. सीओ अंधारे यांनाही नोटीस
बीड (रिपोर्टर): काल 1 मे महाराष्ट्र दिन होता. यानिमित्ताने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला 21 अधिकार्यांची गैरहजेरी होती. गैरहजर राहणार्या अधिकार्यांना नोटीसा बजावण्याचे आदेश राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना दिल्यानंतर आज जिल्हाधिकार्यांनी संबंधितांना नोटीसा काढल्या आहेत. त्यांचा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवाकडे पाठविण्यात येणार आहे. गैरहजरांमध्ये न.प.च्या मुक्याधिकारी नीता अंधारेंसह आदींचा सहभाग होता.
काल 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. या शासकीय कार्यक्रमाला 21 अधिकार्यांनी दांड्या मारल्या होत्या. जे अधिकारी गैरहजर राहिले होते त्या अधिकार्यांना नोटीस बजावण्याचे आदेश काल ना. इंद्रनील नाईक यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना दिले होते. त्यानुसार आज जिल्हाधिकार्यांनी न.प.च्या सीओ नीता अंधारे, जिल्हा उपनिबंधक, सांख्यिकीय अधिकारी यांच्यासह 21 अधिकार्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या अधिकार्यांचा अहवाल मुख्य सचिवांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिकार्यांना नोटीसा बजावल्यानंतर त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात येणार आहे.