शेकडो शतेकर्यांचे जलसमाधी आंदोलन
टी.पी.मुंडेही उतरले पाण्यात
परळी (रिपोर्टर): वाण धरणातले पाणी नदी पात्रात सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी परळी व परिसरातील पंधरा ते वीस गावातल्या नागरिकांनी आज थेट वाण धरणात जावून जलसमाधी आंदोलन केले. या वेळी ओबीसी नेते टी.पी. मुंडे हेही आंदोलनात सहभागी झाले होते. नागापूर वाण धरण पाणी बचाव कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले असून भविष्यात पाणीटंचाई उग्रस्वरुप धारण करेल. त्या अनुषंगाने पाणी सोडले जाऊ नये, आी आंदोलकांची मागणी होती.
नागपूरच्या वाण धरणामध्ये आज अचानक शेकडो शेतकरी पाण्यामध्ये उतरले. परळीसह परिसरातील नागापूर, मांडखेल, बहादूरवाडी, डाबी, दौनापूर, वाण टाकळी, अस्वलंबा, माळहिवरा, गोपाळपूर, तडोळी, बिलेगाव, तळेगाव, टोकेवाडी, बेलंबा, मलनाथपूर, वडखेल, जिरेवाडी, इंदपवाडी येथील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले. सकाळी आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा बहुतांशी शेतकरी हे छातीपयर्ंत पाणी असलेल्या ठिकाणी जाऊन पोहचले. तर सहा शेतकरी हे दूर गेल्याचे लक्षात आले तेव्हा अग्निशामक दलाची टीम त्यांना वाचवण्यासाठी धरणात उतरली.
आंदोलनाच्या वेळी पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासन उपस्थित होते. आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जे लोक नदी पात्रात पाणी सोडा म्हणतात, ही मागणी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. त्या भागात कसल्याही प्रकारची पाणीटंचाई नाही. वाण धरणातून जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा सुरू आहे. जे गाव वाण धरणाखाली येत नाहीत, नदी पाति कुठल्याही पुरवठ्याच्या विहिरी नाहीत, अशा गावांनी चुकीची माहिती दिली आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता नदीपात्रात पाणी सोडण्यात येऊ नये, असे आंदोलकांचे म्हणणे होते.