एसटी महामंडळाने जास्तीच्या गाड्या सोडाव्यात

बीड (रिपोर्टर): उद्या बीड शहरासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी नीटची परीक्षा हाते आहे. या परीक्षेला हजारो विद्यार्थी बसणार असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने जास्तीच्या बसेस सोडाव्यात, अशी मागणी पालकांतून केली जात आहे.
उद्या नीटची परीक्षा देण्यात येत आहे. या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी बसलेले आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागात परीक्षेचे सेंटर आलेले आहेत. परीक्षेपूर्वी काही तास आधी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर हजर रहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने प्रत्येक तालुक्यात जास्तीच्या बसेस सोडाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.