प्रदेशाध्यक्ष सपकाळ, खा. रजनीताई पाटलांसह नेत्यांची उपस्थिती
परळी (रिपोर्टर): राज्यामध्ये सामाजीक साहार्द कायम राहावे यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सद्भावना याि काढण्यात आली. ही यात्रा आज सकाळी परळी शहरामध्ये आली असून या यात्रेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. रजनीताई पाटील यांच्यासह आदी नेत्यांचा सहभाग आहे.
राज्यात नुकत्याच काही घडामोडी घडलेल्या आहेत. यामुळे सामाजिक वातावरण भंग करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी राज्यात काही जातीय शक्ती सलोखा बिघडवून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजातील वातावरण बिघडू नये, सौहार्द निर्माण व्हावे यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात सद्भावना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा आज सकाळी परळी शहरामध्ये आली आहे. परळीतील मोंढा परिसरातील गांधी स्मारक स्तंभ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्क्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. रजनीताई पाटील यांच्यासह आदी नेत्यांचा सहभाग आहे.