वनविभाग घटनास्थळी बिबट्याचे ठसे असल्याचे निष्पन्न,बिबट्या असल्याचा वनविभागाचा दावा
आष्टी (रिपोर्टर):-मंगरूळ परिसरातील मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र असल्याने ऊसाची लागवड आहे.पिकाचा आधार घेत बिबट्या दडण धरुन या तीन दिवसापासून मुक्काम ठोकला असून अनेक श्वानाचा फाडशा पाडला आहे.वनविभागाने याची दखल घेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता,बिबट्याचे ठसे व शेतात बिबट्याचे केस वनविभागाला आढळून आले आहेत.बिबट प्राणी असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
आष्टी तालुक्यातील मंगरूळ परिसरात बागायती क्षेत्र असल्याने येथील शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे.या उसाच्या पिकाचा आधार घेऊन बिबट्याने सुरेश दिंडे यांच्या शेतात मुक्काम ठोकला या ठिकाणी बिबट्याचे वनविभागाला ठसे व केस देखील आढळून आले आहेत बिबट्याने परिसरातील अनेक श्वानाचा फाडशा पाडल्याचे देखील शेतकर्यांनी सांगितले आहे.शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.श्वानाची शिकार करताना एखाद्या बळी जाऊ नये यासाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.घटनेची माहिती कळताच वन परिक्षेत्र अधिकारी संजय ढगे यांच्या आदेशावरून वनरक्षक अशोक काळे,वनरक्षक बाबासाहेब शिंदे, वनरक्षक किरण पंदलवाड, वन कर्मचारी युनूस शेख, मोरे,वनपाल जायभाय आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे
नागरीकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी
बिबट्या चा वावर असलेल्या परिसरात ट्रॅप कॅमेरा लावण्यात येणार असून वनविभाग लक्ष ठेवून आहे.नागरीकांनी घाबरून न जाता बाहेर पडताना काळजी घ्यावी व लहान मुलांना एकटे सोडु नये वनविभाग दक्ष आहे.
संजय ढगे ( वनपरिक्षेत्र अधिकारी,आष्टी)