
बीड,(रिपोर्टर)ः- बीड तालुक्यातील वांगी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाची माहिती दिली जात नसल्याने वांगी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण करण्यात येत आहे.
2024 या दरम्यान वांगी ग्रामपंचायत अंतर्गत अनेक कामे झालेली आहेत. या कामात अफरातफर झाली असून कामाच्या संदर्भात ग्रामपंचायतीकडे माहिती मागविली असता ग्रामपंचायतने माहिती देण्यास टाळाटाळ केली. माहिती देण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना देखिल निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेतली जात नसल्याने हरिभाऊ रावण शेळके हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.