
बीड, (रिपोर्टर)ः- मौजे हिंगणी (बु.), ता. जि. बीड येथील संपत भास्कर कुटे यांनी प्रियदर्शनी महिला नागरी सह.बँक लि.बीड यांचेकडून कर्ज घेतले होते व सदर कर्जाचे परतफेडी पोटी आरोपीने फिर्यादी बँकेस रु.3,39.500/- चा धनादेश दिला होता,परंतू सदर धनादेश अनादरीत झाल्यामुळे फिर्यादी बँके तर्फे आरोपी विरुध्द कलम 138 एन. आय.क्ट प्रमाणे अॅड.ए.एल. जोशी यांचे मार्फत फौजदारी प्रकरण दाखल केले होते.
सदर प्रकरणात फिर्यादी बँकेच्या वतीने दाखल केलेल्या साक्षी पुरावा व केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, बीड यांनी आरोपी संपत भास्कर कुटे, रा. हिंगणी (बु.)ता.जि.बीड यास 5 महिने शिक्षा व नुकसान भरपाई पोटी रु.5,00,000/- फिर्यादी बँकेस देण्याचा आदेश केला. सदर प्रकरणी फिर्यादी तर्फे अॅड. अभिषेक एल. जोशी यांनी कामकाज पाहिले, त्यांना अॅड. कपिलदेव भैरट,अॅड.अक्षय एम. कुलकर्णी, अॅड.शुभम सी. शर्मा यांनी सहकार्य केले. प्रियदर्शनी बँके तर्फे राहुल मुंगळे व उमेश टाक यांनी काम पाहिले.