शिक्षक जागीच ठार, चौसाळा बायपासवर घडली घटना

नेकनूर, (रिपोर्टर)ः-भरधाव वेगात निघालेल्या पोलिसाच्या खासगी गाडीने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील शिक्षक जागीच ठार झाल्याची घटना रात्री अकराच्या दरम्यान चौसाळा बायपासवर घडली.
नेकनूर येथील शिक्षक शेख मुदस्सीर ताहेर हाशमी (वय 46 वर्षे) हे पंढरपूर येथे एका खासगी शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. काल बारावीचा निकाल होता. निकाल लागल्यानंतर ते पंढरपूरहून आपल्या गावी नेकनूरकडे मोटारसायकलवर येत होते. रात्री अकराच्या दरम्यान त्यांच्या मोटारसायकलला बीड येथील एका पोलीस कर्मचार्याची गाडी (क्र. एम.एच. 23 बी.एच. 1836) ने जोराची धडक दिली. या अपघातात शिक्षक शेख मुदस्सीर गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी सदरील ही गाडी ताब्यात घेऊन संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला.