
ऑपरेशन िसिंदूर
बीड (रिपोर्टर): पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर देत भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर रात्री एक वाजून पाच मिनिटांपासून एक वाजून तीस मिनिटांपर्यंत हवाई हल्ले केले. या हल्ल्यात नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करत ते उद्ध्वस्त केले. पहलगाम हल्ल्यात झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्युला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलाने ही कारवाई करत शंभरपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खातमा केला.
यात प्रामुख्याने दहशतवाद्यांचे पाच कमांडरचे मुडदे पडले तर कुख्यात दहशतवादी मसुद अझहर याचे अख्खे कुटुंब यात मारले गेले. मसुद अझहरच्या कुटुंबातले चौदा जण या हल्ल्यात यमसदनी गेले. या भारताच्या कारवाईचे अवघ्या जगातल्या देशांनी समर्थन केले. तर अमेरिकेने पाकिस्तानला जास्त वळवळ करू नका, असा दम देत भारताने केलेली कारवाई हा त्यांचा अधिकार असल्याचे म्हटले.