कलेक्टरांची जिल्हा रुग्णालयातल्या बारीकसारीक गोष्टींवर नजर
रुग्णांसोबत चर्चा, डॉक्टर-कर्मचार्यांना दिल्या सूचना
बीड (रिपोर्टर): जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज सकाळी अचानक बीड जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातल्या जवळपास सर्वच वार्डांत जाऊन तेथील आँको देखा हाल स्वत: पाहिला. बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवत नवीन बांधकामाचे फ्लोअर स्वच्छ करा, उघड्या नालीवर झाकन टाका, फायर एक्झिस्ट आहे का? यासह अन्य धोकादायक बाबींची पाहणी करत त्यावर उपाययोजनेबाबत सूचना विवेक जॉन्सन यांनी उपस्थित डॉक्टर, कर्मचार्यांना केल्या. वॉर्डामध्ये जाऊन रुग्णांची पाहणी केली, नव्हे नव्हेत र त्यांच्या सोबत चर्चाही केली. जॉन्सन यांच्या पाहणी दौर्याने जिल्हा रुग्णालयातले अधिकारी, कर्मचारी आज भल्या सकाळीच रुग्णालयामध्ये डेरेदाखल झालेले दिसून आले.
मध्यंतरी जिल्हा रूग्णालयामध्ये आठ दिवसाच्या कार्यकाळात तीन प्रसूत झालेल्या महिलांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. आज सकाळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा रूग्णालयाला भेट दिली. प्रसृती वार्डासह इतर सर्वच वार्डात जावून त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली. काही रूग्णांशी संवाद साधत रूग्णालयात योग्य उपचार मिळतात का? असे प्रश्न विचारले. जिल्हा रूग्णालयामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या संदर्भात त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांची चर्चा करून काही निर्देश देखिल दिले आहेत. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राऊत, डॉ.आंधळकर सह आदी डॉक्टर, कर्मचारी, स्टाफ उपस्थित होता.
नवीन बांधकामाचीही केली पाहणी
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर नवीन सुरू असलेल्या बांधकामाची देखील पाहणी केली. त्याचबरोबर उघडी असलेली नाली बंद करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकार्यांना दिले. गरोदर महिला वॉर्डाची देखील पाहणी करून याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. आग विझविण्यासाठी काय उपाययोजना आहेत, याबाबतही अधिकार्यांशी प्रश्न उपस्थित करत योग्य ते निर्देश दिले.