परळी पोलिसात गुन्हा दाखल
परळी, (रिपोर्टर)ः- डिजेला बंदी असतांनाही अनेक ठिकाणी डिजे वाजविला जातो. डिजेच्या आवाजामुळे ध्वनीप्रदुषणाचा त्रास होत आहे. मात्र नियमाचे कुठलेही काटेकोरपणे पालन न करता सर्रासपणे मोठ्या आवाजात डिजे वाजविले जात आहेत. परळी शहरात परवानगी न घेता डिजे वाजविला जात होता या प्रकरणी संबंधिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील नगर परिषद समोर रोडवर विना परवाना डिजे वाजविला जात होता. सदरील डिजेमुळे नागरीकांनाही त्रास होत होता. या डिजेची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जावून संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला. दिपक देविदास राठोड यांच्या फिर्यादीवरून बाळु महादेव शिरसाट (वाहन चालक रा.तेलंगणा ता.अंबाजोगाई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.