चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल
बीड, (रिपोर्टर)ः- जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाच चौघाजणांनी लोखंडी रॉड व इतर साहित्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील भावठाणा येथे घडली आहे. या प्रकरणी चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव रामदास शेंडगे (वय 25 रा.भावठाणा) यास जुन्या भांडणाची कुरापत काढून चौघाजणांनी लोखंडी रॉड व इतर साहित्याने मारहाण केली आहे. यामध्ये ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी वैभव शेंडगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी चेतन शामराव मगर, अनिकेत शामराव मगर, सुनिल शेषेराव मगर, महेश अरूण पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.