माजलगावात 13 तर मांजरात 27 टक्के पाण्याचा साठा शिल्लक
बीड, (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होवू लागली. 879 प्रकल्पात 32.27 टक्के पाण्याचा साठा शिल्लक राहिलेला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात 13 तर मांजरा धरणात 27 टक्के पाण्याचा साठा शिल्लक राहिला. अनेक धरणातील पाणी जोत्याच्या खाली गेले आहे तर काही धरणे कोरडे ढाक पडले आहेत. आगामी काळात पाण्याचा प्रश्ननिर्माण होण्याची शक्यता आहे. बहुतांश गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा उपयोग केला जात आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन झपाट्याने होवू लागले.
मराठवाडा विभागात मोठी 11 धरणे आहेत या धरणात 40.45 टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे. 75 मध्यम प्रकल्पात 9.12 टक्के तर 751 लघू प्रकल्पात 17.45 टक्के पाणी साठा शिल्लक राहिला. गोदावरी नदीवरील 15 बंधार्यात 26.27 टक्के आणि तेरणा, मांजरा आणि रेणा नदीवरील 27 बंधार्या 89 टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे. विभागातील एकूण 879 प्रकल्पात 32.27 टक्के पाणी साठा आहे. बीड जिल्ह्यातील मांजरा धरणात 27 टक्के तर माजलगाव धरणात 13 टक्के पाणी शिल्लक राहिले. जायकवाडी धरणात 39 टक्के पाणी आहे.
एकूणच पाण्याची परिस्थिती आगामी काळात गंभीर निर्माण होवू शकते. सध्या मे महिना सुरू आहे उन्हाची तिव्रता अधिक असल्याने पाणी पातळी खालावू लागली. बहुतांश धरणातील पाणी जोत्याच्या खाली गेले तर काही धरणात पाणी राहिलेले नाही. पाणी पुरवठ्यासाठी विहिर, बोअर अधिग्रहण केली जात आहेत. काही ठिकाणी टँकरद्वारे देखिल पाण्याचा पुरवठा केला जात आहे.