
बीड, (रिपोर्टर)ः- कर्ज बाजारीपणाला कंटाळून बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. काल तालुक्यातील खडकी घाट येथील 25 वर्षीय तरूण शेतकर्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या तरूणाकडे कर्ज होते. या कर्जामुळे तो नैराश्येत गेला होता. त्यातच त्याने काल आपले जिवन संपविले.
राजेश श्रीराम ढास (वय 25 रा.खडकीघाट) हा तरूण शेतकरी कर्जबाजारी होता. शेतीमध्ये उत्पादन निघाले नसल्याने तो नैराश्येत राहत होता. काल सकाळी 10 वा. राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. दरवर्षी 200 पेक्षा जास्त शेतकरी कर्जबाजारी, नापिकी, अवकाळी, दुष्काळ तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आपले जिवन संपवित आहेत.