वीज पडून दहा जनावरे ठार, एक शेतकरी जखमी
57 हेक्टरपेक्षा जास्त फळबागांचे नुकसान
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात काल वादळी वार्यासह पाऊस झाला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज पडून लहान मोठे दहा जनावरे ठार झाली असून 1 शेतकरी जखमी झाला. आष्टी, बीड, धारूर या तालुक्यासह इतर तालुक्यातील कांदा, केळी, संत्रा, अंबा, मोसंबी अशा 57 हेक्टरपेक्षा जास्त फळबागांचे नुकसान झाले आहे. बीड शहरामध्येही मोठे नुकसान झाले.
गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रात कोठे ना कोठे अवकाळी पाऊस पडत आहे. काल सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. वार्यासह पाऊस पडला. वार्यामुळे कित्येक झाले कोलमडून पडली तर काही ठिकाणी विजेचे पोल देखिल पडले आहेत. अनेक शेतकर्यांच्या घरावरील पत्रे उडाले. या वादळी वार्यात जिल्ह्यात विज पडून लहान मोठे दहा जनावरे ठार झाली आहेत. तर शिरूर तालुक्यातील दादाहरी जोगदंड हे वीज पडल्याने जखमी झाले आहेत. शेतकर्याचेही मोठे नुकसान झाले असून आष्टी तालुक्यातील कांदा, केळी, संत्रा, मोसंबीच्या बागा भुईसपाट झाल्या. धारूर तालुक्यातही अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बीड, शिरूर या तालुक्यात देखिल अंबा, मोसंबी व भाजीपाल्याचे नुकसान झाले. जिल्ह्यात 57 हेक्टरपेक्षा जास्त फळबागा उध्दवस्त झाल्या आहेत. बीड शहरामध्येही अनेक झाडे कोलमडून पडले तसेच काही नागरीकांच्या घरावरचे पत्रे उडाली आहेत. कालच्या वादळी वार्याने जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.