शहरातील ओपनस्पेसच्या जागा बनावट भुअभिन्यासाद्वारे केल्या विक्री
अधिकारी कर्मचारी,व दलालांच्या संगनमताने कारभार सुरू?
माजलगाव न.प.पालिकेवर गेल्या 3वर्षापेक्षा जास्त कालावधीत प्रशासक राज असल्याने मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण हे पालिकेत फिरकतच नसल्याने तेथील कारभार करणार्या पालिकेच्या कर्मचार्यांनी. बनावट कामे करण्याचा सपाटा लावला असतांनाच काल बोगस दानपत्रा आधारे पिटिआर दिल्याच्या गंभीर प्रकरण उघड झाल्याने संबंधित दलाल व पालिकेच्या 4जबाबदार कर्मचार्यावर गुन्हा दाखल झाल्याने . वरचेवर अनेक प्रकरण उघडतेस येऊ लागले. त्यातच बोगस गुंटेवारी , घरकुलासाठी बोगस पीटीआर गेल्याचा प्रकार समोर आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
माजलगाव न.प. ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून पाहिले जात असतांना याचा गैरफायदा घेण्यासाठी पालिकेतील विविध विभागाचे प्रमुख माहिर असतांनाच बाहेरील दलाला मार्फत आर्थिक फायद्या पोटी बनावट पीटीआर, बनावट गुंठेवारी प्रमाण पत्र,व नाहारकत दिले जात आसल्याचे गैरप्रकार उघड होतांना दिसत आहेत.
मात्र न.प.कार्यालया कडे नेहमी कानात डोळा करत असलेले मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण या गैरप्रकाराबाबत दुर्लक्ष का करत आहेत याचा शोध लागलेला नाही.
माजलगाव शहरात भुअभिन्यासास झालेल्या ठिकाणी शहर विकासासाठी सोडण्यात आलेल्या सार्वजनिक भूखंड (ओपनस्पेस) अनेक भुखंड बनावट भुअभिन्यासाद्वारे मूळ मालकांनी हडप केलेले आहे. करोड रुपयाच्या जागा केवळ पालिकेतील मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्याशी आर्थिक संगणमत करून सदरील ओपन स्पेस च्या जागा हडप केल्या गेल्या आहेत. संबंधित मूळ मालक हे धन दांडगे असल्याने सामान्य माणसांनी तक्रार देण्यास धजावत नाहीत ज्यांनी कुणी तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता त्याला धमकावण्या चे काम केले जात असल्याने या लोकांचे फावले होत आहे.
बोगस गुंठेवारी प्रमाण पत्र आधारे अनेक जागांचे झाले खरेदी खत
सन.2020पुर्वी खरेदी खत आसलेल्या जागेच्या च्या गुंठेवारी करता येतात मात्र सन 2020 नंतर बोगस गुंठेवारी सर्व नंबर 7मध्ये बाजार समितीचे बागवान बंधुंना विक्री केलेल्या जमिनीमध्ये बोगस गुंठेवारी केल्याची माहिती समजली या गंभीर बाबी कडे मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष आर्थिक तडतोडची माहिती समजली
या सह शहरातील अनेक भागात अशाच प्रकारच्या गुंठेवारी झाल्या आहेत. व या सह सदरील गुंठेवारी ची रक्कम न.प.च्या खात्यात जमा होत नसल्याची गंभीर बाब उघड झालेली आहे.
एका वसुली कर्मचारी यांच्या कडुन 2022 पासुन 100पावत्याचे 21क्रमांकाचे बुक अद्याप नगर पालिका कार्यालयात जमा केले नसतांना मुख्याधिकारी महाशय यांनी त्या कर्मचार्यांस पुन्हा नविन बुक दिल्याची माहिती आहे.
21 क्रमांकाच्या बुकातील फाडलेल्या पावत्याची रक्कम लाखो रुपयांच्या घरात गेली असताना सदरील रक्कम न.प.खात्यात जमा नसल्याचे पालिकेतील जबाबदार कर्मचार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. तरी ही त्या कर्मचार्यावर पालिकेतील मोठी जबाबदारी देऊन मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण कोणते हित साध्य करत आहेत याचा बोध होत नाही.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशिक्षणार्थ कालावधीमध्ये माजलगाव न.प.चे सन 2019मध्ये मुख्याधिकारी म्हणून दोन महिने काम पाहिले. या दरम्यान त्यांनी माजलगाव नगरपरिषदेचा बहुतांशी अभ्यास केलेला आहे. त्या दरम्यान नगरपरिषद मध्ये जाणवलेली अपरातफर, प्रकरणी तात्कालीन तिन मुख्याधिकारी ,अनेक लेखापाल यांच्या संबंधीत पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल केले होते तीच परिस्थिती सध्या माजलगाव नगर परिषदे मध्ये सुरु असलेल्या गैर कारभाराकडे स्वतः जिल्हाधिकारी असताना त्यांनी लक्ष द्यावे अशी माजलगाव शहर वासीयांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
संबंधित विभागातील गैर बाबींची चौकशी करुन काही गैर आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल
चंद्रकांत चव्हाण
मुख्याधिकारी न.प.