
महिलेस मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली होती
गेवराई तालुक्यात घडली होती घटना
बीड, (रिपोर्टर) ः गेवराई तालुक्यात अॅट्रासिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुन्या भांडणाची कुरापत काढून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाची आरोपींनी जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळून लावला आहे.
सुनिता आवाड व त्यांच्या घरच्यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. याप्रकरणी गेवराई पोलिसात 20/4/2025 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपी विरोधात अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. न्या. एस.आर. शिंदे यांनी 19/5/2025 रोजी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकला व आरोपीच्या वकिलांनी आरोपीला जामिनावर सोडण्यात यावे, अशी विनंती केली होती. यावर फिर्यादीचे वकील अॅड. सचिन केकाण यांनी आपली बाजू मांडत सदरील प्रकार गंभीर असून महिलेला लज्जास्पद वागणूक दिलेली आहे. त्यामुळे जामिन देऊ नये, अशी विनंती केली. त्यानुसार आरोपीचा जामिन नामंजूर करण्यात आला आहे. फिर्यादीतर्फे अॅड. सचिन केकाण यांनी बाजू मांडली.