बीड (रिपोर्टर) शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी नगर उपाध्यक्ष फारुक पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातून न्यायालयाने पटेल यांची निर्दोष मुक्तता केली.
दि. 28-5-2006 रोजी मंडल अधिकारी अमोल सुधाकर कुरुलकर यांनी फिर्याद दिली होती की, उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी यांच्यासोबत तलाठी उद्धव मारुती हिंदोळे व वाहनचालक सोपान वाघमारे (एम.एच. 23 एफ. 1616) या गाडीमध्ये बीड तालुक्यातील गुरांच्या छावण्या तपासणीसाठी पांगर बावडीच्या पुढे परळी रोडने (पान 7 वर)
जात असताना दोन वाजण्याच्या सुमारास मोची पिंपळगाव फाट्याजवळ ट्रक (क्र. एम.एच. 23 जी. 1198) ही गाडी बीडकडे चोरटी वाळू भरून जात होती. त्यावेळी आमची गाडी पाहून ट्रक ड्रायव्हर गाडी थांबून पळून गेला, त्यामुळे सोबतचे कर्मचारी उतरून गाडी चेक केली असता त्यामध्ये पाच ते साडेपाच ब्रास वाळू होती. त्यानंतर वाहनचालक वाघमारे यांना गाडी तहसील कार्यालयाकडे घेऊन जायची सांगितले असता सदर ट्रक घेऊन जात असताना तेलगाव चौकामध्ये दुपारी अडीचच्या सुमारास फारुक पटेल व त्यांच्या सोबत अनोळखी 50 ते 60 व्यक्तींनी ट्रकला व आम्हाला घेराव घालून अरेरावीची भाषा करत गोंधळ घातला. चालक वाघमारे यांना कॅबिनमध्ये ओढून बाहेर काढले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. जमावातील एका इसमाने ट्रक ताब्यातून घेऊन गेला होता. त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल व एका इसमावर गुन्हा दाखल केला होता. सदरील हा गुन्हा पेठबीड पोलिस स्टेशन येथे कलम 353, 379, 183, 186, 143, 146, 147, 149, 201, 465, 463, 468, 471, 420 भा.दं.वि.चे कलम 21 (1) (2) (3) (4) महाराष्ट्र गौणखनिज कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला होता. शासकीय कामात अडथळा निर्माण करून हायवा ट्रक पळवला व वाळुची चोरी केली, शासनाचे वाळूचे कागदपत्र बनावट तयार केले, फसवणूक केली असे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश डोके यांच्यासमोर हे प्रकरण चालू होते. एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. उपविभागीय दंडाधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. जप्त केलेली वाळू पोलीस स्टेशनमधून गायब झाली हा चुकीचा वाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सबळ पुराव्याअभावी फारुक पटेल व शेख इलियास शेख युनुस यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या वेळी फारुक पटेल व शेख इलियास यांच्या तर्फे न्यायालयात अॅड. अविनाश गंडले यांनी बाजु मांडली त्यांना अॅड. इमरान पटेल अॅड. बप्पा माने, अॅड. सुरक्षा जावळे, अॅड. राजाभाऊ बनसोडे, अॅड. शुभम सरवदे, अॅड. गोवर्धन पायाळ यांनी सहकार्य केले.