
पात्रात कचरा टाकून घाण केली जाते
बीड, (रिपोर्टर)ः- बिंदूसरा नदीचे पात्र गेल्या काही दिवसापुर्वी स्वच्छ करण्यात आले. या स्वच्छतेमुळे पात्र चांगले दिसू लागले. नगरपालिका मात्र पुन्हा पात्राच्या परिसरात कचरा टाकत असल्याचे दिसून येवू लागले. नदीपात्र स्वच्छ केलंय कशासाठी ? नगर पालिकेने तरी पात्र स्वच्छ ठेवायला हवं.
बिंदूसरा नदीच्या पात्राला नाल्याचे स्वरूप येवू लागले. दिवसेदिवस पात्र छोटे होवू लागले. नदीच्या कडीने झाडे झुडपे वाढलेली आहेत. त्यातच नगर पालिका नदी पात्रातच घाण टाकू लागल्याने पात्र अस्वच्छ झाले होते. मात्र गेल्या काही दिवसापुर्वी पात्राची स्वच्छता करण्यात आली. पात्र स्वच्छ झाल्या नंतरपुन्हा नगर पालिकाच शहरातील कचरा त्या ठिकाणी टाकत असल्याचे दिसून येत आहे. नगर पालिकेले तरी नदीपात्र अस्वच्छ करू नये अशी मागणी केली जात आहे.