वडवणीत काँग्रेसच्या वतीने केंद्र व राज्य सरकार विरोधात संताप
वडवणी (रिपोर्टर):- देशासह राज्यातील तरुणाचे प्रश्न मार्गी लावण्यात यावेत तसेच अग्निपथ योजना व जी.एस.टी रद्द करण्यात यावी व राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा यासह अन्य मागण्यासाठी आज काँग्रेस पार्टीच्या वतीने वडवणी तहसिलदार यांना निवेदन देऊन संताप व्यक्त केला आहे.सदरील निवेदन तालुकाध्यक्ष ज्ञानदेव (जिजा) आंधळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे कि,केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जिवनावश्यक वस्तुंवरील वाढवलेल्या जी.एस.टी. मुळे सामान्य माणसाचे जगने मुश्किल झाले आहे. केंद्र सरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा कोणताही विचार न करता घाई घाईत चालु केलेल्या भारतीय सैन्य दलातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. महागाई, बेरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र व राज्य सरकार कारणीभुत आहे. अग्निपथ या योजनेला तरूण वर्गाचा तिव्र विरोध असून कॉंग्रेस पक्ष तरूणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी. तसेच अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व नागरीकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने एकरी 50,000/ रूपयाची आर्थिक मदत द्यावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा,केंद्र शासन व राज्य शासनाने महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना व जिवनावश्यक वस्तुंवरील वाढवलेली जी.एस.टी. रद्द करून अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अन्यथा वडवणी तालुका काँग्रेस कमिटी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील अशा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव (जिजा) आंधळे यांच्यासह पाडुरंग मस्के, विजय पवार, शकील शेख, बाबासाहेब झोडगे, विष्णू उजगरे, गणेश आडे, अरुण सावंत,सुरेश उजगरे, परमेश्वर मुंडे, लक्ष्मण कोठुळे, बाळासाहेब माने, वसंत वाढरे, शघर्ष राऊत, जगन्नाथ आंधळे,दौलत सय्यद, शिवाजी शिंदे आदी कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या व उपस्थित होते.