बीड (रिपोर्टर) देशात महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपा त्यांच्यासोबत असणार्या मित्रपक्षांनाच संपवतो, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी पंजाबमधील शिरोमणी अकाल दलाचं उदाहरणही दिलं आणि अकाली दलाला भाजपाने संपवल्याचा आरोप केला.
शरद पवार म्हणाले, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाही आणि आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील, असं विधान भाजपाकडून करण्यात आलं. यातून नितीश कुमार यांनी केलेली तक्रार स्पष्ट होते.