जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बीड(रिपोर्टर)ः-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी जिल्हा रुग्णालयाला चांगली शिस्त लावली. यामुळे सर्वसाामान्य रुग्णांना वेळेवर आणि चांगले उपचार मिळू लागले. साबळे यांची बदली होत असून सदरील ही बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांसह पत्रकारांनी धरणे आंदोलन केले.
डॉ.सुरेश साबळे आल्यापासून त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक सुधारणा केल्या. रुग्णालयाला शिस्त लावण्याचे काम केले. कामचुकार डॉक्टरांसह कर्मचार्यांवर त्यांनी नेहमीच पाळत ठेवत शिस्तीचे डोस दिले. एकूणच डॉ.साबळे यांचा कारभार चांगला असतांना त्यांची बदली केली जात आहे. सदरील ही बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात येत आले. यावेळी संपादक संतोष मानूरकर, डॉ.गणेश ढवळे, अॅड.शेख शफीक, खुर्शीद आलम, पत्रकार ढाकणे, शिवराज बांगर, राजेंद्र आमटे, गणपत गोले, संभाजी सुर्वे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.