बीड-ऑनलाईन रिपोर्टर
मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी बीड येथून मुंबईकडे निघालेले विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला अन मेटे यांच्ये दुर्दैवी निधन झाले या घटनेने अवघ्या महाराष्ट्रात शोकाकुल होऊन पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या विषय चर्चित आला .त्याचा प्रत्यय बीड येथे अंत्यविधी स्थळी पाहावयास मिळाला . मेटे यांच्या पार्थिवावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होत होते त्या ठिकाणी आधीच अनेक मान्यवरांनी शोक प्रकट करताना मेटे यांनी ज्या मराठा आरक्षणासाठी आपले उभे आयुष्य खर्च केले आरक्षणाच्या बैठकीसाठी जाताना मेटेंना बलिदान आले त्यांचे स्वप्न साकार करणे हीच त्यांना खरी श्रदांजली असेल अशी भावना अनेकांनी बोलावून दाखवली . जेंव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अंत्यविधी स्थळी आले तेंव्हा उपस्थितांनी प्रचंड घोषणा बाजी करण्यास सुरवात केले एकाच मिशन मराठा आरक्षण या सह अमर राहे च्या घोषणांनी काही काळ वातावरण गोंधळाचे होतेय हे पाहताच मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांनी हात जोडून उपस्थितांना शांत केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री विखे पाटील, तान्हाजी सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. श्रीकांत शिंदे, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आ. भीमराव केराम, आ. संदीप क्षीरसागर, भारती लव्हेकर, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, आ. अभिमन्यू पवार, माजी मंत्री सदाभाऊ खोत, पाशा पटेल, नमिता मुंदडा, आ. श्वेता महाले, आ. सुमन आर. पाटील, आ. धनंजय मुंडे, खा. प्रतिम मुंडे, पंकजाताई मुंडेे, खा. जलील, आ. रत्नाकर गुट्टे, आ. बाळासाहेब आजबे, संजय दौड, अशोक पाटील, सुनिल धांडे, सुरेश नवले, राजेंद्र जगताप, जनार्धन तुपे, मात्री मंत्री खोतकर, सिराज देशमुख, माजी मंत्री, जयदत्त क्षीरसागर, पापा मोदी, आ. प्रकाश सोळंके, बदामराव पंडीत, औरंगाबाद विभागाचे पोलिस महानिरीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक ठाकूर, उपविभागीय अधिकारी नामेदव टिळेकर, तहसीलदार सुहास हजारे, अधीक्षक कृषी अधिकारी जेजूरकर, कृषी अधिकारी साळवे, प्रा. मोराळे, अशोक हिंगे, अनिल जगताप, केशव आंधळे, कुडलकी खांडे, मुळकू, भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, फुलचंद कराड, टी. पी मुंडे, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, पप्पू कागदे, आदी मान्यवर उपस्थित होते.