परळी (रिपोर्टर)- तालुक्यातील कन्हेरवाडी येथे बोगस लाभदारक दाखवून निधी हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामध्ये दोषी अधिकार्यांसह कर्मचार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसांी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.
पंचायत समिती प्रशासनातील अधिकार्यांनी खोटे कागदपत्रांना ग्राह्य धरून शौचालयासह इतर कामांमध्ये अपहार केला आहे. यात दोषी असलेल्या अधिकार्यांसह कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जे खरे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचे कामही करण्यात आले असून या सर्वच कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी विकास मुंडे यांनी केली आहे.